For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध : नूतन मुख्याधिकारी अश्विनी पाटील

04:00 PM Apr 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध   नूतन मुख्याधिकारी अश्विनी पाटील
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी अश्विनी पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी श्रीमती पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. शहरातील अनेक विकास कामे ठप्प पडली असून या कामांना गती देण्यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी केली.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर, ऍड. परिमल नाईक, उदय नाईक, नासिर शेख, आनंद नेवगी, मनोज नाईक, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, भारतीय जनता पार्टीचे श्याम केनवडेकर आदी उपस्थित होते.सावंतवाडी शहरातील नगरोत्थान मधील विकास कामे अद्यापही पूर्णत्वास आलेली नाहीत, ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावी, अनेक कामे अपूर्ण असून काही कामे बंद आहेत याकडे लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे केली. त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून कचरा उचल करण्याकडे लक्ष घालून पाणीटंचाईवरही लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी सबनीसवाडा आणि उभा बाजार येथील पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती दूर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. तर नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविकांकडून करण्यात आली. यावेळी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शहराच्या विकासासाठी सर्वत्र निधी खर्च करण्याकडे लक्ष असणार आहे. नगरोत्थान बरोबर अन्य विकास निधी खर्च करून जास्तीत जास्त विकास कामे करण्याची ग्वाही मुख्याधिकारी पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.