For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमिटमेंट

06:37 AM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कमिटमेंट
Advertisement

खरंतर अनेक मानसशास्त्राrय शोधनिबंध सांगतात की नाते टिकवण्यासाठी ‘कमिटमेंट’ हा आवश्यक घटक आहे. कोणत्याही नात्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पॅट्रीशीया नॉलर या मानस तज्ञांनी विवाहाच्या बाबतीत एक विधान केले आहे, ‘लग्न म्हणजे एका अर्थी स्व: च्या कक्षा वाढविणे दोघांचे जीवन एकत्र येण्याआधी आपले स्वत:चे काही कर्तृत्व असते. आता दोघे एक झाल्यानंतर ते कर्तृत्व, त्या कक्षा जास्त मोठ्या होतात. प्रसरण पावतात. आपल्या एकट्याला जे शक्य होते, त्यापेक्षा कितीतरी गोष्टी आता दोघांना मिळून सहज शक्य होतात.

Advertisement

मॅडम थोडसं वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. बोला ना.

ही माझी मुलगी रिमा उच्चशिक्षित आहे.

Advertisement

कॉर्पोरेट जगतामध्ये काम करत आहे. बाकी सर्व व्यवस्थित आहे परंतु हिच्या विवाह विषयीच्या संकल्पना, स्वच्छंदी जगण्याचे वेड आम्हाला न पटणारे आहे. काय झालं आहे नेमकं?

हिला कोणतंही बंधन घालणारा मुलगा नवरा म्हणून नकोय. कमिटमेंट, बांधिलकी, एकनिष्ठ राहणे हे शब्दच तिला भयंकर वाटतात. मी अनेकदा तिला समजावून सांगितलं. मॅडम, मी स्वत: उच्चशिक्षित, उच्चपदस्त आहे. मित्र-मैत्रिणी असणार यावर माझा बिलकुल आक्षेप नाही. मी संशयी नाही परंतु संपूर्ण अनिर्बंध जगणं मला मान्य नाही.

लग्नानंतर असं बिनधास्त मित्रांसोबत भटकणं नको इतकं मोकळं वागणं हे पचवणं इतकं सहज सोपं असेल का? तिला हे सारं सांगितलं तर ती म्हणते, ‘त्यात काय एवढं? दोघांनी तसेच ठरवून एकत्र राहिलं तर कशाला काय बिनसते?’ हे सारं म्हणायला ठीक आहे हो. माझ्या मैत्रिणीचा अशाच विचारसरणीचा मुलगा त्याच्याशी मिळतेजुळते विचार असणाऱ्या मुलीसोबत त्याने लग्न केले. बंधन मुक्त जगण्याचे पुरस्कर्ते हे! परंतु ज्यावेळी वर्षभराने त्याच्या बायकोची तिच्या मित्राबरोबर असलेली

‘कॅज्युअल रिलेशनशिप घट्ट झाली’ तेव्हा ते पचवणं त्यांना अवघड झालं. मग आरोप, प्रत्यारोप, भांडण.. दोघांमध्ये तिसऱ्याच अशा पद्धतीने अस्तित्व सहन करणे सोपं असतं का हो? निर्मळ निखळ मैत्रीला विरोध नाहीच. मी स्त्राr पुरुष भेदभाव करते अशातला भाग नाही परंतु घसरण्याची  भरकटत जाण्याची थेअरी मला मान्य नाही. माझे स्पष्ट मत असं आहे जर तुम्ही इतके व्यक्तिवादी, स्वतंत्र, संपूर्ण स्वच्छंदी जगण्याच्या वेडाने झपाटले असाल तर लग्नच करायचं कशासाठी? आर्थिक दृष्ट्या सक्षम आहात. स्वत:ला सर्व बाबतीत सक्षम म्हणतात मग पार्टनरच्या आधाराची गरज हवी कशाला?

रीमा माझी मुलगी असली तरी तिला मी स्पष्ट सांगितले आहे असं असेल तर लग्न करू नकोस परंतु ‘लाइफ पार्टनर असायला हवा.’ हेही म्हणते. हा वैचारिक गुंता कसा सोडवावा हेच कळत नाही मला. मला सांगा, ‘नात्यात कुठचीच कमिटमेंट नसेल तर ते टिकणार का? आणि नाही टिकलं तर परत दुसरं, तिसरं, चौथं नातं अशी वाटचाल करत राहणार आहे हे किती शहाणपणाचं? प्लीज तुम्हीच समजावून सांगा तिला. अगदी स्पष्ट मत मांडणारी रीमाची आई, रीमाच्या बंधनमुक्त जगण्याच्या संकल्पनेने कमालीची अस्वस्थ झाली होती. वरील उदाहरणातील रीमा सारख्या अनेक तरुण-तरुणी पाहायला मिळतात. विवाहानंतर तिची एखाद्या मित्राशी व त्याची एखाद्या मैत्रिणीची जवळीक वाढली तर त्यात काय एवढं? अशा गोष्टी होतंच असतात असं म्हणून हा प्रश्न क्षणार्धात झटकून टाकणारे अनेक जण भेटतात. स्वत:च वेगळ्या तऱ्हेने निर्माण केलेल्या या नव्या मूल्यवस्थेत संपूर्ण बंधनमुक्त जगण्याची संकल्पना तत्वता मान्य असलेले नंतर मात्र गडबडतात. ही चार घटकांची मौज पचवणं मग भल्याभल्यांनाही अवघड होऊन बसतं. खरंतर अनेक मानसशास्त्राrय शोधनिबंध सांगतात की नाते टिकवण्यासाठी ‘कमिटमेंट’ हा आवश्यक घटक आहे.

कोणत्याही नात्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पॅट्रीशीया नॉलर या मानस तज्ञांनी विवाहाच्या बाबतीत एक विधान केले आहे, ‘लग्न म्हणजे एका अर्थी स्व: च्या कक्षा वाढविणे दोघांचे जीवन एकत्र येण्याआधी आपले स्वत:चे काही कर्तृत्व असते. आता दोघे एक झाल्यानंतर ते कर्तृत्व, त्या कक्षा जास्त मोठ्या होतात. प्रसरण पावतात. आपल्या एकट्याला जे शक्य होते, त्यापेक्षा कितीतरी गोष्टी आता दोघांना मिळून सहज शक्य होतात. नॉलर यांचे हे विधान काही तरुण-तरुणींना पटणारही नाही परंतु या गोष्टीवर बारकाईने विचार केला तर अनेक गोष्टी लक्षात येतील, सहज शक्य होतील. खरंतर कुणीतरी आपलं असणं आणि आपण कुणाचे तरी असणं ही माणसाची भावनिक गरज आहे.

अनेक गोष्टींचा विचार करून आपल्या पूर्वजांनी अत्यंत हुशारीने विवाह संस्थेची निर्मिती केली आहे. तसं पाहायला गेलं तर विवाह संस्था आणि त्या माध्यमातून निर्माण होणारी कुटुंब संस्था हा दीर्घकालीन टिकलेला समाजाचा एक मूलभूत घटक आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये तडजोड, बांधिलकी, वचनबद्धता हे त्याचे सारे टेकू कुठेतरी डळमळताना दिसतात. विवाह संस्थेच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अनेक समस्यांसारखेच संपूर्ण बंधनमुक्त जगण्याचा ध्यास ही एक समस्या बनत चालली आहे. एखाद्या माणसाचा लगेच कंटाळा यावा इतकी नाती पटकन शिळी होतात का? प्रचंड हुशारी असणाऱ्या आणि स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या तरुण-तरुणींना दहा-पंधरा तास झोकुन देऊन ते काम करणं, आपल्या कामाशी निगडित कमिटमेंट मान्य आहे. ती नसेल तर त्यामध्ये यश मिळणार नाही याची जाणीव आहे मग नात्यातील कमिटमेंटचे एवढे भय का वाटावे?

थोडी थोडी गुंतवणूक करत आपण एखादी ‘अॅसेट’ निर्माण करतो. त्याप्रमाणे भक्कम भावनात्मक आधारासाठी, नात्याच्या स्थैर्यासाठी, नात्यामधील ‘भावनिक इन्व्हेस्टमेंट’ फार महत्त्वाची आहे. माणूस म्हणून प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. एकमेकांचे स्वत्व जपण्यासाठी मोकळीक हवीच परंतु संपूर्ण मुक्त जगणं हे सुरुवातीला छान भासलं तरी नंतर वेगळ्या समस्या उद्भवू शकतात, हे लक्षात घ्यायला हवं.

कॅज्युअल वाटणाऱ्या रिलेशनशिप नको इतक्या घट्ट झाल्या तर नातं टिकणं कठीणच! कितीही स्वतंत्र विचारसरणीचे असला तरी वैवाहिक नात्यांमध्ये दोघांमध्ये तिसऱ्याचं अस्तित्व मान्य करणे, पचवणे हे त्रासदायक ठरते. आरोप, प्रत्यारोप, खुलासे, स्पष्टीकरण या साऱ्यांनी घायाळ होत दोघांबरोबरच त्यांच्याशी निगडित असणाऱ्या अगदी जवळच्या माणसांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. मित्र-मैत्रिणी असणे याला आक्षेप नाहीच परंतु स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा अतिरेक, अट्टाहास आणि यातून निर्माण होणारे बेपर्वा वागणं यामुळे वैवाहिक नात्यात वादळ येईलच परंतु बिनशिडाच्या होडीसारखी आपली जीवन नौका भरकटत जाऊन दिशा चुकण्याची शक्यता अधिक. अर्थात ‘बोन्साय बनून खुरडत जगायचे की वटवृक्षाप्रमाणे विशाल होत सावली द्यायला शिकायचे’ हा निर्णय ज्याचा त्यांनीच घ्यायला हवा हे मात्र निश्चित!!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.