महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मनपाच्या गोवावेस पेट्रोलपंपाला आयुक्तांची भेट

10:48 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सभागृहातील वादळी चर्चेनंतर घ्यावी लागली दखल

Advertisement

बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह अधिकाऱ्यांनी गोवावेस येथील मनपाच्या लीज संपलेल्या पेट्रोलपंपला भेट देऊन परिसराची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत लीज संपलेल्या मालमत्तांवरून वादळी चर्चा झाली होती. याची दखल घेऊन मनपा आयुक्तांनी भेट दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.महानगरपालिकेच्या लीज संपलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याबरोबरच त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात यावा, तसेच थकलेली बाकी वसूल करण्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत वादळी चर्चा झाली होती. लीज संपलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली होती.

Advertisement

लीज संपलेल्या मालमत्तांच्या लिलावाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे मनपाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच यापूर्वी लीज देऊनही संबंधित लीज घेतलेल्या व्यक्तींनी मनपाचा कर भरलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाकी राहिली आहे. ती बाकीही वसूल करण्यासंदर्भात मनपाकडून ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप नगरसेवकांतून करण्यात आला होता. बाकी वसूल करण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मनपाला आर्थिक तोटा होत आहे. झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. याबाबत वादळी चर्चा झाली होती. नगरसेवकांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. यामुळे मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना याची दखल घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवरच मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोवावेस येथील पेट्रोलपंपाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

1 कोटी 42 लाख बाकी 

पेट्रोलपंप लीजवर घेतलेल्या व्यक्तीकडून मनपाचे 1 कोटी 42 लाख बाकी येणे आहे. तर दुसऱ्या बाजूला बीपीसीएल कंपनीने सदर पेट्रोलपंपवर दावा दाखल केला आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने मनपाला सदर पेट्रोलपंपचा लिलाव करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पेट्रोलपंपची लिलाव प्रक्रिया राबविणे शक्य होणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच मनपा सभागृहात झालेल्या वादळी चर्चेनंतर आयुक्तांना मनपाच्या मालमत्तांची पाहणी करणे भाग पडले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article