For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News: आयुक्तांच्या देखरेखीखाली मनपाची वॉर रूम, सादरीकरणाचे होणार काम

05:49 PM Aug 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangli news  आयुक्तांच्या देखरेखीखाली मनपाची वॉर रूम  सादरीकरणाचे होणार काम
Advertisement

सिटी व्हिजन प्लॅन करून आयुक्त गांधी यांच्याकडे सादर करायचे आहे

Advertisement

सांगली : मनपा क्षेत्रातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आयुक्तांच्या देखरेखीखाली बॉररूम मधून नियंत्रण होणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त आयुक्त नोडल अधिकारी नियुक्त असणार आहेत. सरळ नियंत्रण आणि नियोजन होऊन माझ्या देखरेखीखाली अंमलबजावणी वेळेत होणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली.

ते म्हणाले, महानगरपालिकेकडील विविध महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, बॉर रूम अंतर्गत प्रकल्पांचा आढावा घेणे, त्याचा प्रगती अहवाल तयार करणे आणि त्या अहवालाचे सादरीकरण करण्यासाठी महापालिकेच्या दोन्ही अत्तिरिक्त आयुक्तांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

Advertisement

अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे खाऊ गल्ली, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण करणे, माधवनगर, हनुमाननगर अग्निशमन केंद्र तयार करणे, रमाई उद्यान, जलमंदिर, सौंदर्याकरणं करणे, गव्हर्मेंट कॉलनी, शामनगर पाण्याच्या टाक्या पूर्ण करणे, काळी खण,

प्रतापसिंह उद्यान पक्षी उद्यान पूर्ण करणे, जामवाडी कुस्ती केंद्र चैत्रबन नाला पूर्ण करणे, पीएमई बस प्रकल्प प्रगती पथावर आणणे, मिरज आणि हनुमाननगर भाजी मंडई सद्यस्थिती बाबत आढावा सादर करणेची जबाबदारी आहे. अति. आयुक्त निलेश देशमुख यांना एसएस रॅकिंग इमप्रोव्हमेंट प्लॅन, घंटागाडी नियोजन करणे, नॅशनल अकाऊंटस कोडच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही पूर्ण करणे.

सिटी व्हिजन प्लॅन करून आयुक्त गांधी यांच्याकडे सादर करायचे आहे. तिन्ही शहराच्या विकास योजनाबाबत टीपी स्किमबाबत तपशीलवार नियोजन करणे. मनपा क्षेत्रात व्यवसाय परवाने, लायसेन्स, ना हरकतबाबत धोरण अंमलबजावणी बाबत विभागाशी समन्वयातून अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे काम असणार आहे.

माझी वसुंधराअंतर्गत उद्याने विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत बायो हैं डोजन प्रोजक्टबाबत अहवाल सादर करणे, मनपाच्या मिळकतीबाबत अद्यावत मिळकत रजिस्टर करण्यासाठी व्यापक नियोजन करून कार्यवाही करणे, उपयोग पोर्टल तयार करणे, विविध विभागासाठी व नागरिकांसाठी तक्रार निवारण आणि समन्वय साठी व्हॉटसअॅप चॅटबॉट तयार करण्याचे नियोजन करणे. पुढील सहा महिन्यासाठी करवसुली नियोजन करून कृती आराखडा सादर करणे, सीएसआर मधील प्रकल्प उत्पन्न वाढीचे नवीन प्रकल्पाचा विचार करून कृती आराखडा सादर करणे ही कामे होणार आहेत.

दर तीन दिवसांनी आढावा

अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांकडून प्रत्येक प्रकल्पाचा दर तीन दिवसांनी आढावा घेण्याचा आहे, प्रकल्पाच्या अंमलबजावणीची कार्यक्षमता आणि वेळेच्या बंधनांमध्ये होणारी प्रगतीची निरंतर तपासणी करून योग्य सुधारणा किंवा दुरुस्तीचे निर्देश संबधित विभाग प्रमुखांना देण्याचे आहेत.

दर सोमवारी प्रगती अहवालाचे सादरीकरण

अति. आयुक्तांनी प्रगती अहवाल तयार करुन दर सोमवारी महापालिका आयुक्तांकडे समक्षात सादर करायचा आहे. आपले मत नोंदवून पुढील काळात प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मनपा क्षेत्रातील विकास कामाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व बाबीवर स्वतः लक्ष केंद्रित करून अंमलबजावणी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.