For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सोलापुरात पर्जन्य जलवाहिनी कामाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची पाहणी

06:29 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापुरात पर्जन्य जलवाहिनी कामाची आयुक्त डॉ  सचिन ओम्बासे यांची पाहणी
Advertisement

                             सोलापूर शहरात पाणी साचू नये यासाठी नियोजनबद्ध कामावर भर

Advertisement

सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरातील नाला क्र. २० (पोगुल विहीर ते हैदराबाद रोड) तसेच नाला क्र. २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या पर्जन्य जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या ठिकाणी सुरू असलेले काम उपरोक्त नमूद सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) राबविण्यात येत असून, त्यामध्ये पर्जन्य जलवाहिनीचे योग्य प्रकारे ट्रेनिंग करणे, काही भागात नाले बंदिस्त करणे, आवश्यक त्या ठिकाणी पाईप टाकणे आदी कामांचा समावेश आहे. शहरातील काही भागात सध्या पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळून ते वर्षभर (१२ महिने) वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्जन्य जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळणे हे आरोग्यास अपायकारक असून नियमबाह्य असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता, वेळापत्रक व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. पर्जन्य जलवाहिनी व ड्रेनेज यांची स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्यात यावी, तसेच भविष्यात शहरात पाणी साचण्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, एन्व्हायरोसेफ कन्सल्टंटचे टीम लीडर गोकुळ चितारी, सागर करोसेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.