For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केसीआर यांच्या पुत्राला आयोगाची नोटीस

05:12 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
केसीआर यांच्या पुत्राला आयोगाची नोटीस
Advertisement

निवडणूक आयोगाने तेलंगणातील सत्तारुढ पक्ष भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामा राव यांना नोटीस बजावली आहे. रामा राव यांच्यावर एका शासकीय कार्यालयात निवडणुकीचा प्रचार करण्याचा आरोप आहे. केटीआर हे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत.

Advertisement

केटीआर यांच्यावर हे आरोप काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केले आहेत. त्यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. रामा राव यांनी 20 नोव्हेंबर रोजी टी-वर्क्सच्या (एक शासकीय संस्था) कार्यालयाचा दौरा केला आणि तेथे मोठ्या संख्येत काम करत असलेल्या युवांना नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. राज्यात काँग्रेस, बीआरएस आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत होणार आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूक पाहता निवडणूक आयोगाने कठोर नियम लागू केले आहेत. नियमांनुसार आचारसंहिता लागू असल्यास मंत्र्यांना स्वत:च्या अधिकृत दौऱ्याला प्रचारासोबत जोडता येत नाही आणि शासकीय यंत्रणेचा किंवा कर्मचाऱ्यांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही. रामा राव हे आगामी निवडणुकीत उमेदवार असण्यासोबत बीआरएस पक्षाचे स्टार प्रचारक असल्याचे आयोगाने स्वत:च्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. रामा राव यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे मानत आयोगाने त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. निर्धारित वेळेत त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यास आयोगाकडून त्यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

Advertisement
Advertisement
Tags :

.