For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल व्हेईकल एक्सपोचे सावंतवाडीत उद्घाटन

05:48 PM Mar 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कमर्शियल व्हेईकल एक्सपोचे सावंतवाडीत उद्घाटन
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

अखिल भारतीय मराठा महासंघाने कमर्शियल व्हेईकल एक्सपो या राबविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शासन सर्व सुविधा देत आहे . त्याचा लाभ निश्चितपणे घ्या . अखिल भारतीय मराठा महासंघ जे उपक्रम राबवेल त्या उपक्रमाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत त्याला सर्व सहकार्य केले जाईल असे मत आमदार तथा सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथील शिवउद्यान जवळ आजपासून १० मार्च असे तीन दिवसीय असे अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ भरवण्यात आले आहे. मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व्याज प्रतिकृती योजनेअंतर्गत व्यावसायिक वाहन खरेदी कर्ज प्रकरण या कार्यक्रमात ठेवण्यात आले होते. यावेळी या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुभाष सावंत , तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत. माजी नगराध्यक्ष संजू परब. जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विशाल सावंत, दिगंबर नाईक, प्रशांत ठाकूर, आनंद नाईक, अभिजित सावंत , बापू राऊळ, शांताराम पारधी, प्रसाद राऊळ, आनंद आईर सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे ,एडवोकेट रुजूल पाटणकर ,दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते, महाराष्ट्र ट्रक ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष प्रकाश गवळी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष व विनोद सावंत अपर्णा कोठावळे , प्रशांत कोठावळे, सतीश बागवे आधी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या आणि सिंधु विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठा उद्योजक डिरेक्टरी' या उपक्रमा अंतर्गत २०२२ मध्ये कुडाळ येथे व्हेईकल एक्सपो घेतला होता. या यशस्वी प्रयोगानंतर ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद आणि मागणीमुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा कमर्शियल व्हेईकल एक्सपो-२०२५ घेतले गेले आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तरुणांना ही नवी संधी उपलब्ध झाली आहे या माध्यमातून मराठा समाजातील व बहुजन समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अशा उपक्रमाचा फायदा घ्यावा असे ते म्हणाले . यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी म्हणाले अखिल भारतीय मराठा महासंघाने वाहन खरेदी कर्ज योजना अभियान राबवले हे खरोखरच कौतुकास्पद आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवत आहोत तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले आज पहिल्या दिवशी जवळपास 500 जणांनी नोंदणी केली आहे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.