For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यावसायिक सिलिंडर 50 रुपयांनी महागला

06:44 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्यावसायिक सिलिंडर 50 रुपयांनी महागला
Advertisement

14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादरीकरणापूर्वी देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन एलपीजी सिलिंडरचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. तथापि, दिलासा म्हणजे घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

व्यापारी-उद्योजकांना आजच्या अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना 49 ते 50 रुपयांच्या या वाढीमुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान ढाबा मालकांसाठी आता स्वयंपाक महाग होणार आहे. तसेच त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या हॉटेलमधील डिश थाळीवर होऊ शकतो. नवीनतम सुधारणांनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1,740.50 रुपये इतकी झाली आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत कायम राहिली आहे ही दिलासादायक बाब आहे. त्याची किंमत शेवटची 8 एप्रिल 2025 रोजी अपडेट करण्यात आली होती.

अर्थसंकल्पाच्या दिवशी सिलिंडर दरामधील बदल

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, गेल्या पाच वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती अपरिवर्तित राहिल्या. तथापि, व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल झाला आहे. 1 फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 91.50, कोलकातामध्ये 89, मुंबईत 91.50 आणि चेन्नईमध्ये 91 रुपयांनी घट झाली. 2023 मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यावसायिक किमतीत कोणताही बदल झाला नाही. 2024 मध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 18 रुपयांनी वाढल्या होत्या.

कमर्शियल सिलिंडर दर        : 1 फेब्रुवारी 2026 पासून

शहर                     जुनी किंमत             नवीन किंमत                    वाढ

दिल्ली                     1,691.50                 1,740.50                    49.00

कोलकाता              1,795.00                   1,844.50                  49.50

मुंबई                   1,642.50                      1,692.00                   49.50

चेन्नई                    1,849.50                    1,899.50                    50.00

Advertisement
Tags :

.