For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडर पुन्हा महागला

06:09 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर पुन्हा महागला
Advertisement

42 रुपयांनी वाढली किंमत : 5 किलोचा सिलिंडर 11 रुपयांनी महाग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ केली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीत कमर्शियल सिलिंडर 42 रुपयांनी महाग होत आता 3,113.50 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर कोलकात्यात याची किमंत 53.50 रुपयांनी वाढून 3255.50 रुपयांवर पोहोचली आहे.

Advertisement

कमर्शियल सिलिंडर पुन्हा महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि अन्य व्यावसायिक ग्राहकांवर अतिरिक्त भार वाढू शकतो. परंतु घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी यापूर्वी 1 मे रोजी कमर्शियल एलपीजी सिलिंडरचे दर वाढविले होते. तेव्हा किमतीत  थेट 993 रुपयांची वाढ करण्यात आली होती. कमर्शियल सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांकडून केला जात असतो. यामुळे ही दरवाढ आता ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचविण्याची दाट शक्यता आहे.

याचबरोबर तेल विपणन कंपन्यांनी छोटे व्यापारी आणि लोकांकडून वापरण्यात येणाऱ्या 5 किलोग्रॅमच्या एफटीएल सिलिंडरच्या किमतीतही 11 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे दिल्लीत हा छोटा सिलिंडर आता 821.50 रुपयांमध्ये मिळणार आहे.

एलपीजीच्या किमतीतील ही वाढ जागतिक ऊर्जा संकटामुळे करण्यात आली आहे. पश्चिम आशियात भू-राजकीय अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. भारत सध्या पुरवठ्यातील अडथळे आणि आयातीच्या वाढलेल्या खर्चाच्या मोठ्या दबावाला सामोरा जात आहे.

Advertisement
Tags :

.