महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्यावसायिक सिलिंडर 39 रुपयांनी महाग

06:34 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रविवार, 1 सप्टेंबर 2024 पासून 19 किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 39 रुपयांनी महागला आहे. आता दिल्लीतील किंमत 39 रुपयांनी वाढून 1,691.50 रुपये झाली आहे. पूर्वी तो दिल्लीत 1,652.50 मध्ये मिळत होता. मुंबईत सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढून 1,605 रुपयांवरून 1,644 रुपयांवर पोहोचली आहे. कमर्शियल सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या घरगुती सिलिंडर दिल्लीत 803 रुपयांना तर मुंबईमध्ये 802.50 रुपयांना उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सध्या कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 103.44 रुपये आणि डिझेल 89.97 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article