For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यावसायिक सिलिंडर साडेआठ रुपयांनी महाग

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्यावसायिक सिलिंडर साडेआठ रुपयांनी महाग
Advertisement

घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थै’

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली. गुरुवारी सकाळीच तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट केल्यानुसार कमर्शियल सिलिंडर साडेआठ रुपयांनी महाग झाला. तथापि, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने विशेषत: गृहिणींनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. 1 ऑगस्टपासूनच बदललेले दर लागू झाले आहेत. केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त महिलांच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कपात केली होती. त्यानंतर आतापर्यंत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 803 ऊपये असून देशाच्या अन्य भागात साधारणपणे 810 ते 830 रुपये या पातळीवर आहेत.

Advertisement

देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,652.50 रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत 1,644 रुपये होती. तसेच, पश्चिम बंगालच्या राजधानीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,756 रुपयांवरून 1764.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. मुंबईत नवीन दर लागू झाल्यानंतर आजपासून व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,605 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यातच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.