कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमर्शियल सिलिंडर 40 रुपयांनी स्वस्त

06:35 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कपातीनंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,757 रुपये झाली आहे. 1 डिसेंबर रोजीच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती प्रतिसिलिंडर 21 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता सरकारच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. कमर्शियल सिलिंडरच्या दरात कपात केली असली तरी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या 14.2 किलो सिलिंडरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये 903 ते 920 रुपयांच्या दरम्यान आहे.

मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,710 ऊपये झाली आहे. तर कोलकातामध्ये 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1,868.50 रुपये असेल. चेन्नईमध्ये ही किंमत 1,929 रुपये आहे. राज्य पातळीवरील करांमधील फरकामुळे किमतीत काही प्रमाणात फरक दिसून येत आहे.

देशातील सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅसचे दर ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती लक्षात घेऊन ही किंमत ठरवली जाते. मात्र, ह्यावेळी महिन्याच्या मध्यातच पुन्हा दरात बदल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article