For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडर 20 रुपयांनी स्वस्त

06:39 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर 20 रुपयांनी स्वस्त
Advertisement

घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्यामुळे 1 मेपासून महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. बुधवारपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 20 रुपयांनी कमी झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली असली तरी नवीन महिन्याच्या प्रारंभी घरगीती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. राजधानी दिल्लीत कमर्शियल सिलिंडर 1,745.50 रुपयांना उपलब्ध आहे. देशाच्या अन्य भागात वेगवेगळ्या ठिकाणी या दरात थोडाफार फरक आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीतील ही कपात नुकत्याच जागतिक तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे झाली आहे.

Advertisement

एलपीजीच्या किमतीत कपात केल्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,764.50 ऊपयांवरून 1,745.50 रुपयांवर आली आहे. मुंबईत नवीन किंमत 1,698.50 रुपये निश्चित करण्यात आली. चेन्नईमध्ये किंमत 1,911 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 20 रुपयांच्या कपातीनंतर किंमत 1,859 रुपये आहे.

Advertisement
Tags :

.