For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कमर्शियल सिलिंडर 17 रुपयांपर्यंत महाग

06:20 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर 17 रुपयांपर्यंत महाग
Advertisement

दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका : सलग तीन महिन्यांपासून वाढीचे सत्र सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या दरात 10 ते 17 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीचे दर सलग सहाव्या महिन्यातही स्थिर राहिल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

तेल कंपन्यांनी दिवाळीपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 17 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कमर्शियल सिलिंडरच्या वाढलेल्या दरांमुळे व्यावसायिक आणि रेस्टॉरंट मालकांच्या खर्चात थोडी वाढ होईल. परिणामी, हॉटेलधारक चहा आणि नाश्त्याच्या दरात वाढ करू शकतात. तसेच, सणासुदीच्या दिवसात कार्यक्रम आणि लग्नसमारंभातील केटरिंगदेखील महाग होऊ शकते.

1 नोव्हेंबर 2026 पासून, दिल्लीमध्ये 19-किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 10 रुपयांनी वाढल्याने आता 2,820 रुपये इतका सुधारित दर झाला आहे. गेल्या महिन्यात ही किंमत 2,810 रुपये होती. नोव्हेंबर 2026 मधील सर्वाधिक दरवाढ कोलकातामध्ये झाली. त्याठिकाणी ऑक्टोबरमधील 2,954 रुपयांच्या तुलनेत किंमत 17 रुपयांनी वाढून प्रतिसिलिंडर 2,971 रुपये झाली. मुंबईमध्ये गेल्या महिन्यातील 2,764.50 रुपये प्रतिसिलिंडरच्या तुलनेत एलपीजीची किंमत 10.50 रुपयांनी वाढून आता 2,775 रुपये झाली. शिवाय, चेन्नईमध्ये 11.50 रुपयांनी वाढून आता नवीन किंमत 2,994.50 रुपये झाली आहे.

Advertisement
Tags :

.