For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त

06:22 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त
Advertisement

हॉटेल व्यावसायिकांना दिलासा : ‘घरगुती’चे दर स्थिर

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

देशभरातील हॉटेल चालकांसह इतर व्यवसायांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात जवळपास 200 रुपयांची कपात केली आहे. शनिवारपासून कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 209 आणि दिल्लीमध्ये 202 ने कपात करण्यात आली आहे. या बदलानंतर, कोलकातामध्ये 19 किलोग्रॉमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2,872.50 रुपये झाली. मात्र, तूर्तास घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ऑगस्ट महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर कायम राहिल्याने गृहिणी काहीशा निराश झाल्या आहेत. 1 ऑगस्टपासून लागू झालेल्या या बदलाचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि खाद्य व्यवसायातील लोकांना होण्याची अपेक्षा आहे.

2026 मध्ये 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात सतत चढ-उतार होत राहिला. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात दरात वाढ झाली होती. याचदरम्यान मे महिन्यात ते 3,071.50 आणि जूनमध्ये 3,113.50 या विक्रमी पातळीवर पोहोचले. या महागाईनंतर तेल कंपन्यांनी जुलैमध्ये दरात 183.50 ची कपात करून कमर्शियल एलपीजीची किंमत 2,930 वर आणली. त्यानंतर आता 1 ऑगस्टपासून याच दरात पुन्हा कपात करण्यात आली आहे. दिल्लीतील 202 रुपयांच्या कपातीनंतर या सिलिंडरची किंमत 2,728 रुपये झाली आहे.

Advertisement
Tags :

.