महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत

04:33 PM Oct 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रुपेश राऊळांचे टीकास्त्र

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे भाजपच्या वाटेवर होते मात्र भाजपकडून त्यांना पक्षप्रवेशास नकार देण्यात आल्यामुळे केसरकर धनुष्यबाणावरच लढणार असल्याचे सांगत आहेत. भाजपमधून राजन तेली हे उबाठामध्ये प्रवेश करणार या संदर्भात काहीच माहिती नाही मात्र गद्दार सोडून तेलीच काय कोणीही आल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू असेही श्री राऊळ म्हणाले.

सावंतवाडी येथील शिवसेने शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत श्री राऊळ बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा,विनोद ठाकूर,संदेश मडूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले गेले साडेचार वर्ष कोमात गेलेले मंत्री दीपक केसरकर निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जोमात दिसत आहेत महाराष्ट्र राज्यात माझ्यासारखा विकास कोणीच करू शकत नाही माझ्यासारखा सक्षम लोकप्रतिनिधी कोण होऊ शकत नाही अशा अविर्भावात ते बोलत आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत केलेल्या घोषणाबाजीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार जयंत पाटील यांनी सावंतवाडीतच येऊन जोरदार चपराक दिली आहे एकूणच केसरकर हे मंत्री म्हणून ज्याप्रमाणे आपल्या मतदारसंघात बदनाम झाले आहेत त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातही ते बदनाम झाल्याचे दिसून आले.ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद टेंडर प्रक्रियेमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांकडून होणारा बाऊन्सर राडा असो किवां त्यांच्याच सहकाऱ्यांवर दयावान झाल्याचे ठपका बसत असो एकूणच या सर्व प्रकारातून केसरकर यांचा थंड दहशतवाद पुढे येत आहे. आता तर रत्नसिंधूमध्ये भ्रष्टाचार झाला चा प्रकारही पुढे येत आहेत 29 लाखाचा ट्रांसफार्मर संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून चौकशीची मागणी करणार आहे सदरचे ट्रान्सफॉर्मर कुठल्या निकषाखाली दिले गेले याची चौकशी झाली पाहिजे असे आमचे मागणे असणार आहे. बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत असे सांगणाऱ्या मंत्री केसरकर यांनी आपल्या शहरांमध्ये बाळासाहेबांच्या नावाने सुरू केलेल्या प्रबोधनी मध्ये युवक युवतींना फसवण्याचे काम केरसरकर यांनी केले. त्यामुळे आरोग्य पर्यटन बेरोजगारी यावर आता घोषणाबाजी करणारे केसरकर नेमका विकास कसा साधणार याचे उत्तर त्यांनी द्यावे.

भाजपचे राजन तेली यांनी रत्नसिंधू मधील भ्रष्टाचारा संदर्भात मंत्री केसरकर यांच्यावर आरोप केले मात्र सदरचे आरोप त्यांनी अर्धवट रित्या करू नये वेंगुर्ल्यातील संबंधित सूत्रधार कोण याचे नावही त्यांनी जाहीर करावे प्ले करून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येणे गरजेचे आहे आणि त्यांनी तो आणावा असे आवाहनही रुपेश राऊळ यांनी केले. मायकल डिसोजायनी केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील काजू ,आबा बागायतदाराना पिक विमा ची रक्कम देऊ शकले नाहीत त्यामुळे उद्या सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी सहभागी होतील असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update # rupesh rawool # deepak kesarkar
Next Article