For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानला प्रारंभ

10:53 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानला प्रारंभ
Advertisement

बेळगाव : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यानंतर रमजानला सुरुवात झाली आहे. पहाटे 5.20 मिनिटांनी ते सायंकाळी 6.47 मि. पर्यंत पहिला रोजा झाला. या रजमान पर्वामुळे मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: बाजारात फळांबरोबर इतर खाद्यपदार्थांची रेलचेल पाहावयास मिळाली. रमजान महिन्यात उपवास आणि नियमित नमाज पठण होते. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याबरोबर बाजारात सुक्या मेव्याची आवकही वाढली आहे. खारीक, खजूर यांसह कलिंगड, टरबूज, पपई आदी फळांनाही पसती मिळू लागली आहे. मंगळवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Advertisement

मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई

रमजानसाठी सोमवारी रात्रीपासूनच ताराविह नमाजाला सुरुवात झाली. हा नमाज दररोज रात्री महिनाभर अदा केला जाणार आहे. शहरात 100 हून अधिक लहान-मोठ्या मशिदी आहेत. यामध्ये नमाज पठण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.