कुरिहाळ प्राथमिक शाळेच्या विकासकामाची सुरु वात
06:24 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून त्यांचे स्वीय साहाय्यक व प्रदेश काँग्रेसचे सदस्य मलगौडा पाटील यांनी शनिवारी बोडक्यानटट्टी व कुरिहाळ या गावांना भेट दिली. कुरिहाळ येथील मराठी- कन्नड शाळेला संरक्षण भिंत, फलक, टाईल्स, प्रवेशद्वार यासारख्या कामाची सुरु वात केली. शेतवडीला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचीही सुरु वात यावेळी करण्यात आली. ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य यांच्यासह नागेश नायक, परशुराम नायक, उमेश कांबळे, दयानंद पाटील, जोतिबा मनमाडकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement