महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जानेवारी 2025 नंतर जनगणनेला प्रारंभ

07:00 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यांना 31 डिसेंबरपर्यंत सीमा निश्चितीसाठी मुदत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

देशव्यापी जनगणना आता 2025 मध्येच सुरू होईल. राज्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांची मंडळे, जिल्हे, उपविभाग, तालुका आणि गावांच्या सीमा बदलण्याची परवानगी देणारा आदेश जनगणना निबंधकांनी जारी केला आहे. यापूर्वी ही मर्यादा 30 जूनपर्यंत होती. वास्तविक, जनगणना सुरू करण्यासाठी सरकारी सीमा निश्चित करणे ही पहिली अट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जनगणना 1 जानेवारी 2025 नंतर कधीही सुरू होऊ शकते. त्यानंतर आता 3 वर्षांच्या कालावधीतील जनगणनेचे काम 18-24 महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

गेल्या दोन वर्षांत सरकारी सीमा सील करण्याच्या आदेशाला मुदतवाढ मिळत आहे. आतापर्यंत सप्टेंबरमध्ये जनगणना सुरू होईल, अशी आशा होती. याचदरम्यान ओबीसीशी संबंधित कॉलम जोडण्याबाबत शंका, जात गणनेची राजकीय मागणी ही जनगणना सुरू होण्याच्या मार्गात अडथळा ठरत असल्याचे बोलले जात आहे. ओबीसी संबंधित प्रश्न जनगणनेत समाविष्ट करायचे की नाही याचा निर्णय केंद्राने घ्यायचा आहे. हा प्रश्न जोडायचा झाल्यास जनगणना कायद्यात सुधारणा करावी लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 2025 च्या जनगणनेपासून नवीन जनगणना चक्र सुरू होईल. 2025 नंतर 2035 आणि 2045 मध्ये जनगणना होऊ शकते. 1881 पासून दर दहा वर्षांनी होणारी जनगणना 2021 मध्ये होणार होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत गेली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article