महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अय्यप्पास्वामी व्रताला प्रारंभ

06:22 AM Nov 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

स्वामी अय्यप्पाच्या व्रताला शनिवारपासून (ता. 16) सुऊवात झाली आहे. प्रत्येक वर्षी 16 नोव्हेंबर ते 14 जानेवारी असा एकूण 60 दिवसांच्या व्रताचा कालावधी असून अय्यप्पाच्या मालाधारी भक्तांनी 44 दिवसांचे व्रत करून 44 व्या दिवशी मालाधारी शबरीमला (केरळ) येथे मकरज्योती दर्शनासाठी हजर राहावे, असा नियम असल्याची माहिती भक्त शेखर शेट्टी (शिवाजीनगर, बेळगाव) यांनी दिली.

Advertisement

व्रत काळात पहाटे साडेपाचपूर्वी व सायंकाळी साडेपाचनंतर थंड पाण्याने स्नान करून ओलेत्याने वैयक्तिक किंवा सामूहिकपणे अय्यप्पा स्वामी प्रतिमा पूजन, भजन, नामस्मरण करण्यात येते. काळी वस्त्रेs परिधान करणे, मालाधारण, अनवाणी चालणे, एकच वेळ नाष्टा व भोजन करणे, नाष्ट्याचे किंवा भोजनातील पदार्थ स्वत: बनवून खाणे, शक्य न झाल्यास वयाची साठी ओलांडलेल्या महिला किंवा कुमारिक़ांकडून बनवून घ्यावेत. व्रतकाळात पायांची नखे, केशकर्तन, दाढी करणे, डोक्याला किंवा शरीराला तेल लावणे, अंगाला साबण लावून स्नान करणे टाळले जाते. शनिवार हा अय्यप्पा स्वामींचा वार असून या दिवशी होणाऱ्या विशेष पूजेला फडीपूजा असे म्हटले आहे. अय्यप्पा स्वामींची दीक्षा घेतलेल्या भक्तांना गुऊस्वामी म्हटले जाते. बेळगाव शहरात 5 हजारांहून अधिक अय्यप्पास्वामी भक्त असल्याचे शेखर शेट्टी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article