For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळात मिळाला धुमकेतूसारखा ग्रह

06:22 AM Jan 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंतराळात मिळाला धुमकेतूसारखा ग्रह
Advertisement

40 पृथ्वींपेक्षाही आकाराने मोठा

Advertisement

पृथ्वीच्या नजीक एक एलियन वर्ल्ड असून ज्याने वैज्ञानिकांना अचंबित केले आहे. प्रत्यक्षात एक ग्रह असून त्याला धुमकेतूसारखे शेपूट आहे. हे शेपूट इतके मोठे आहे की यात 40 पृथ्वी सामावू शकतात. हा ग्रह त्याच्या ताऱ्याच्या अत्यंत नजीक आहे. शेपटासारखी दिसणारी ही विशाल संरचना या एक्सोप्लॅनेटच्या वायुमंडळातून गळती होणाऱ्या वायूमुळे निर्माण झाल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. याला तारकीय वाऱ्यांद्वारे उडविले जात असून त्याला विंडसॉक म्हटले जाते.

या एक्सोप्लॅनेटचे नाव डब्ल्यूएएसपी-69 बी असून तो एक गॅसीय ग्रह आहे. याचा आकार जवळपास गुरु ग्रहासमान आहे. परंतु याचे द्रव्यमान एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. पृथ्वीपासून हा ग्रह सुमारे 160 प्रकाशवर्षे दूर आहे. परंतु त्याच्या ताऱ्याच्या अत्यंत नजीक आहे. याचमुळे हा ग्रह 3.9 दिवसांमध्ये स्वत:च्या सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करतो. 2014 मध्ये या ग्रहाचा शोध लागला होता. डब्ल्यूएएसपी-69 बी दर सेकंदाला 2 लाख टन वायू बाहेर सोडत असून यात बहुतांशकरून हेलियम आणि हायड्रोजन आहे. अत्यंत तप्त असल्याने असे घडत असल्याचे मानले जाते.

Advertisement

हा वायू 7 अब्ज वर्षापासून बाहेर पडत आहे. ज्या दराने ग्रहावरून वायू बाहेर पडतोय ते  पाहता एक्सोप्लॅनेटने स्वत:च्या जीवनकाळादरम्यान 7 पृथ्वीइतके द्रव्यमान गमाविले आहे. डब्ल्यूएएसपी-69बीकडे धुमकेतूप्रमाणे शेपूट आहे, जी अंतराळात गळती होणाऱ्या वायूमुळे निर्माण झाली आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

एस़्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स नियतकालिकात प्रकाशित एका अध्ययनात संशोधकांनी हवाई येथील वेधशाळेच्या डाटाद्वारे ग्रह आणि त्याच्या वातावरणाचे विश्लेषण पेल. प्रत्यक्षात याचे शेपूट 5.6 लाख किलोमीटरपर्यंत फैलावले असून जे पृथ्वीच्या रुंदीपेक्षा सुमारे 44 पट असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले.

मागील अवलोकनांमध्ये डब्ल्यूएएसपी-69 बीचे एक शेपूट असू शकते याचे संकेत मिळाले हेत. परंतु आम्ही ग्रहाचे हेलियम शेपूट विशाल ग्रहाच्या त्रिज्येपेक्षा कमीतकमी 7 पट अधिक फैलावलेले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तारकीय हवा गळती होणाऱ्या वायूला ग्रहापासून दूर ढकलू लागल्यावर या ग्रहाचे शेपूट तयार होते. तारकीय हवा आमच्या सूर्यापासून निघणाऱ्या सौरहवांसमान आहेत. जर तारकीय हवा गायब झाली तर शेपूटही संपुष्टात येईल असे अध्ययनाचे प्रमुख लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील एस्ट्रोफिजिक्स डॉक्टरेट विद्यार्थी डकोटा टायलर यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.