आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून नेरूर -गोंधयाळेत अद्ययावत व्यायामशाळा
कुडाळ / वार्ताहर
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर - गोंधयाळे येथे अद्ययावत अशी व्यायामशाळा उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण आमदार श्री नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तेथील गोंधयाळे येथील भवानी मित्रमंडळाने आमदार नाईक यांच्याकडे व्यायामशाळेसाठी निधीची मागणी केली होती. त्यांनी सदर मागणी पूर्ण केली. या व्यायामशाळेचा लोकार्पण कार्यक्रम आमदार श्री नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला.तसेच व्यायामशाळेची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा पिंगूळीचे माजी सरपंच दादा चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,नेरूरचे माजी सरपंच शेखर गावडे,कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर,सरपंच भक्ती घाडी,उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,माजी उपसरपंच समद मुजावर, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मी सडवेलकर, युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे, राजू गवंडे,अमित राणे,माजी उपसरपंच सुनील गावडे,मनोज सडवेलकर, ग्रा. प. सदस्य प्रभाकर गावडे,निकिता सडवेलकर,अरुणा चव्हाण,प्रवीण नेरुरकर,संतोष कुडाळकर,रुचा पावसकर, भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष धोंडी कांबळी, काका गावडे,प्रसाद गावडे,शरद मसुरकर,रामा कांबळी,अजित मार्गी,गणेश गावडे,बाबल गावडे, जगन्नाथ गावडे आदींसह नेरूर ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.