For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढे या

12:40 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढे या
Advertisement

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन

Advertisement

बेळगाव : पोलीस आणि प्रशासन यांना सहकार्य करून समाजात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना केली. अल्पसंख्यांकांसाठी पंतप्रधानांनी दिलेल्या 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा अल्पसंख्याक समितीचे राज्य सरकार नियुक्त सदस्य उपस्थित होते. जेन-झी बद्दल चिंता व्यक्त करून ते म्हणाले, ही पिढी एक तर भविष्य घडवू शकते किंवा बिघडवू शकते. त्यांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करून त्यांना सामाजिक मूल्यांचे महत्त्व पटवून देऊया.

समाज माध्यमांचा दुरुपयोग, वाढती व्यसनाधिनता, जुगार आणि तत्सम गुन्हे यामध्ये ही पिढी अडकत चालली आहे. त्यापासून या पिढीला वाचविणे हे आपले कर्तव्य आहे. पोलीस खात्याने याबाबत सुरू केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. व अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांनी जागृती मोहिमेध्ये सक्रिय सहभागी होऊन या पिढीला जागृत केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त एन. बी. बरमणी, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी विजयप्रकाश पुजेर व अन्य अधिकारी यांनीसुद्धा विविध सूचना केल्या. या बैठकीत मोहल्ला समिती स्थापन करणे, शाळा व कॉलेजमध्ये जागृती करणे, शहराचे सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शीख आदी समुदायाचे शाहीद मेमन, नियाज सौदागर, परमिंदर भाटिया, लुईस रॉड्रीक्स व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.