For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

म्हैसूर दसऱ्याच्या जंम्बो सवारीची रंगीत तालीम

06:13 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूर दसऱ्याच्या जंम्बो सवारीची रंगीत तालीम
Advertisement

विजयादशमीच्या भव्य मिरवणुकीसाठी तयारीला वेग : सुरक्षा व्यवस्थेची पाहणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवातील विजयादशमीच्या दिवशी निघणाऱ्या भव्य जंम्बो सवारी मिरवणुकीच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राजवाड्यासमोर जंम्बो सवारीची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सरावादरम्यान मिरवणुकीचा मार्ग, पोलीस पथकांची हालचाल आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

Advertisement

विजयादशमीच्या दिवशी सोन्याच्या अंबारीत विराजमान होणाऱ्या चामुंडेश्वरी देवीला पुष्पार्चना करण्याच्या पद्धतीनुसार तालीम घेण्यात आली. मिरवणूक कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी विविध पथकांमधील समन्वय आणि नियोजनाची तपासणी करण्यात आली. या रंगीत तालमीत निशाण हत्ती म्हणून अभिमन्यू, नौबत हत्ती म्हणून गोपी तर रांगेतील हत्ती म्हणून महेंद्र, श्रीराम आणि श्रीकंठ सहभागी झाले. त्यांच्या मागोमाग चैत्रा, लक्ष्मी, सुग्रीव आणि एकलव्य हे हत्ती मार्गक्रमण करत होते. अखेरीस अंबारीचा हत्ती प्रशांत आणि कुमकी हत्ती कावेरी व रुपा यांनी सहभाग घेतला.

दसरा महोत्सवातील महेंद्र, श्रीराम, श्रीकंठ, कावेरी, अभिमन्यू, गोपी, चैत्रा, लक्ष्मी, सुग्रीव, एकलव्य, रुपा आणि प्रशांत या हत्तींनी तालमीत भाग घेऊन मिरवणुकीच्या शिस्तबद्ध संचलनाचा सराव केला. याशिवाय पोलीस बँड पथक आणि घोडदळातील कर्मचाऱ्यांनीही सरावात सहभाग नोंदविला. विजयादशमीच्या दिवशी जंम्बो सवारी सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, मिरवणुकीचा क्रम आणि विविध पथकांमधील समन्वयाची तपासणी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.