For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलंबियाचा पराग्वेवर विजय

06:22 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोलंबियाचा पराग्वेवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ होस्टन

Advertisement

2024 च्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत सोमवारी येथे ड गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलंबियाने पराग्वेचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करत विजयी सलामी दिली.

या सामन्यात कोलंबिया संघातील जेम्स रॉड्रिग्जने हे दोन्ही गोल नोंदविण्यासाठी महत्त्वाची साथ दिली. 32 व्या मिनिटाला रॉड्रिग्जने दिलेल्या पासवर डॅनियल मूनोझने हेडरद्वारे कोलंबियाचे खाते उघडले. 42 व्या मिनिटाला रॉड्रिग्जने शानदार चाल रचत दिलेल्या पासवर जेफरसन लेमाने कोलंबियाचा दुसरा गोल केला. 69 व्या मिनिटाला ज्युलिओ एनिस्कोने पराग्वेचा एकमेव गोल नोंदविला. पराग्वे विरुद्ध कोलंबियाने आतापर्यंत 24 सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. आता कोलंबियाचा या स्पर्धेतील पुढील सामना कोस्टा रिका बरोबर होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.