For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलंबियाने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले

06:24 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोलंबियाने ब्राझीलला 1 1 बरोबरीत रोखले
Advertisement

कोपा अमेरिका : ब्राझीलची गाठ आता उरुग्वेशी, तर कोलंबियाची पनामाशी

Advertisement

सांता क्लारा (अमेरिका)/ वृत्तसंस्था 

कोपा अमेरिका स्पर्धेत कोलंबियाने ब्राझीलला 1-1 असे बरोबरीत रोखून दाखविले. कोलंबियाचे प्रशिक्षक नेस्टर लॉरेन्झो यांनी संघाला बलाढ्या ब्राझीलविऊद्धच्या उष्ण वातावरणातील सामन्यातील दोन सत्रांमध्ये आणि जवळपास आणखी 10 मिनिटांच्या स्टॉपेज टाइममध्ये धारदार आणि उत्साही राहायला लावण्यात मोलाची भूमिका पार पाडली. डॅनियल मुनोझने पहिल्या सत्राच्या स्टॉपेज टाइममध्ये बरोबरीचा गोल केला आणि कोलंबियान कोपा अमेरिकेतील पहिल्या फेरीअंती गटस्तरावर प्रथम स्थान मिळविले तसेच अपराजित राहण्याचा सिलसिला वाढवत 26 सामन्यांवर नेला. कोलंबियाचा गोलरक्षक कॅमिलो वर्गासने दुसऱ्या सत्राच्या स्टॉपेज टाईमच्या पाचव्या मिनिटाला अँड्रियास पेरेराने हाणलेला फटका निष्फळ ठवत ब्राझीलची अंतिम संधी उधळवून लावली.

Advertisement

ग्लेनडेल, अॅरिझोना येथे शनिवारी कोलंबिया उपांत्यपूर्व फेरीत पनामाशी खेळेल, तर ब्राझील लास वेगास येथे रात्री उऊग्वेविऊद्धच्या अधिक कठीण सामन्यात उतरेल. ‘उऊग्वेविऊद्धच सामना कठीण असेल, परंतु त्यांनाही हे माहीत आहे की, त्यांचा ब्राझीलविऊद्धचा सामना कठीण असेल’, असे ब्राझीलचे प्रशिक्षक डोरिव्हल ज्युनियर नंतर म्हणाले. पहिल्या फेरीअंती ब्राझीलच्या पाच गुणांच्या तुलनेत कोलंबियाचे सात गुण झाले. कोलंबियाला 84 व्या मिनिटाला एक-दोन गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या, परंतु त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. त्यापूर्वी 12 व्या मिनिटाला राफिन्हाने जाळ्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात डाव्या पायाने फ्री किक हाणत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली होती. 70,971 लोकांनी या सामन्याला हजेरी लावली.

Advertisement

.