For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवाद्यांशी साटेलोटे, दोन कर्मचारी निलंबित

06:07 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहशतवाद्यांशी साटेलोटे   दोन कर्मचारी निलंबित
Advertisement

एलजी मनोज सिन्हा यांची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. सूत्रांनुसार, या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर बऱ्याच काळापासून पाळत ठेवण्यात आली होती. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक रामबन जिह्यातील शिक्षण विभागातील वर्ग 4 कर्मचारी फरहत अली खांडे, यांच्यावर हिजबुल मुजाहिदीनसाठी काम केल्याचा आरोप आहे. दुसरा कर्मचारी बांदीपोरा येथील असून त्याचे नावा मोहम्मद शफी दार असे आहे. तो ग्रामीण विकास विभागात कार्यरत होता. दहशतवादी संघटनांशी साटेलोटे असल्याप्रकरणी दोन सरकारी कर्मचाऱ्यांवर राज्यपालांकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement

.