दुचाकींमध्ये धडक, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
03:54 PM Mar 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
रत्नागिरी :
Advertisement
मिरजोळे एमआयडीसी येथील गद्रे तिठा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले होत़े या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल केल़ा सौरभ दत्तात्रय जाधव (ऱा तळेगांव, दाभाडे-पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े
सौरभ हा 4 मार्च रोजी दुचाकी (एमएच 14 जेक्यु 8007)घेवून एमआयडीसीमधील गद्रे तिठा येथून जात होत़ा यावेळी समोरील दुचाकीला (एमएच 08 बीबी 5745) मागून धडक दिली, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े अपघातात मोटारसायकल चालक गुऊप्रसाद दिलीप लिंगायत (19, ऱा एसटी स्टँड, रत्नागिरी), त्याच्या मागे बसलेली राधा सुबोध अणेराव (19, ऱा नाचणे रोड रत्नागिरी) व सौरभ जाधव हे जखमी झाले होत़े
Advertisement
Advertisement