कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : शिरसंगीतील महाकाय वटवृक्ष परिसरात देवराई उभारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

12:31 PM Nov 28, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                          जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची शिरसंगी वटवृक्षाला भेट

Advertisement

कोल्हापूर : शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षाच्या नैसर्गिक संवर्धनाकरीता तेथील ५ हेक्टर परिसरात नैसर्गिक संवर्धनावर आधारित देवराई उभारण्यासाठी परिसर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. आजरा तालुक्यातील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देत त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला 

Advertisement

आजरा आजरा तालुक्यातील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली.परिसरातील माहिती जाणून घेतली. यासाठी गावाने आवश्यक सूचना देण्याचेही त्यांनी आवाहन केले. यावेळी तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते.

शिरसंगीतील या वटवृक्षाखाली गोठणदेव मंदिर आहे. हा वटवृक्ष एक ते दीड एकर जागेत पसरलेला असून त्याठिकाणी थंडगार वातावरण अनुभवायला मिळते.याठिकाणी आजूबाजूचा परिसरही निसर्गरम्य आहे. प्रसिद्ध 'जोगवा' चित्रपटात हा वटवृक्ष दाखवला आहे. हे ३०० वर्षाहून अधिक वयाचे वडाचे झाड असल्याचे लोक सांगतात. शिरसंगीतील पर्यावरणीय वारसा असलेल्या महाकाय वटवृक्ष परिसरात देवराईसाठी आणि तेथील सुशोभिकरणासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिल्या.

या परिसरात नैसर्गिक संवर्धनावर आधारित कामे होणार असून स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्या अनुभवाच्या आधारे या ठिकाणी देवराई उभी करण्यासाठी भविष्यात काम करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर नैसर्गिकरित्या संवर्धन करून विविध वृक्षलागवड करून देवराई उभारण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. देवराईबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या इतर वनराईची पाहणीही गावकऱ्यांनी करावी, अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

शिरसंगीची माहिती लोकांना देण्यासाठी आणि एकत्रित माहिती तयार करण्याचे काम शिक्षकांना सांगण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी असलेला निसर्ग आणि पर्यावरणाचा वारसा येणाऱ्या पिढीला समजावा, यासाठी शालेय सहलीही आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Advertisement
Tags :
#BanyanTree#Devrai#EcoConservation#EcoDevelopment#EnvironmentalHeritage#HeritageTree#kolhapurnews#MaharashtraTourismi #Shirsangi
Next Article