कलेक्टर साहेब, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा; शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले द्या!
कारखान्याकडील थकीत ऊस बिलांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करत साबळे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे आवाहन केले. “कलेक्टर साहेब, दिलेल्या आश्वासनाला जागा आणि भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लावा. अन्यथा आपल्या दालनात अन्नत्याग आंदोलन करावे लागेल,” असा इशारा रविराज साबळे पाटील यांनी दिला.
भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवार दुपारपासून उमरगा तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थकीत बिले मिळावीत आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यानंतर आता प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
