For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवृष्टीमुळे पडझड घरांचा लाभ बोगस लाभार्थ्यांना

09:54 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अतिवृष्टीमुळे पडझड घरांचा लाभ बोगस लाभार्थ्यांना
Advertisement

मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप : कारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसह जि. पं.-ता. पं. अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

वार्ताहर /अगसगे

म्हाळेनट्टी गावामध्ये अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे खऱ्या लाभार्थ्यांना मंजूर न करता बोगस लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, अभियंता, स्थानिक ग्राम पंचायत सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशा मागणीचे निवेदन शुक्रवार दि. 2 रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीला ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. अगसगे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये म्हाळेनट्टी गावचा समावेश येतो. 2019 पासून 2023 पर्यंत अतिवृष्टीमुळे म्हाळेनट्टी गावामध्ये गोरगरिबांची घरे कोसळली आहेत. त्यांना ही घरे मंजूर झाली नाहीत. इतरांना घरे कोसळेली नसतानाही घरे मंजूर झाली आहेत.

Advertisement

सदर बोगस कोसळलेले घर एकाकडे दाखवून दुसरीकडे घर बांधण्यात येत आहे. तर दोन घरे कोसळलेली आहेत असे दाखवून एकच घर बांधण्यात येत आहे. खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ झाला नाही. पत्नीच्या नावावर एक घर तर पतीच्या नावावर एक घर अशी दोन घरे मंजूर केली आहेत. खोटी कागदपत्रे तयार करून ही घरे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी पीडीओ अभियंता, तलाठी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि योग्य लाभार्थ्यांना न्याय मिळावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुरेश तिरमाळे, भरमा नाईक, जोतिबा बाळेकुंद्री, विक्रम नाईक, शंकर नाईक, शिवपुत्र मेत्री, रमेश नाईक, यल्लाप्पा नाईक, मारुती पवार, अमृत पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पीडीओ मुजावर यांचा मनमानी कारभार

अगसगे ग्राम पंचायतीचा पदभार स्वीकारताच पीडीओ एन. ए. मुजावर यांनी बोगस कामांना चालना दिली आहे. उद्योग खात्री योजनेमध्ये मशिनरी लावून बिले काढली आहेत. ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांचे ठराव न मांडता आपल्या सोयीनुसार ठराव लिहीले आहेत. कायद्यावर बोट ठेवून ग्रामस्थांची कामे करून देत नाहीत. संगणक उताऱ्यासाठी पैशाची मागणी करण्यात येते. इतरांना कायद्याचे ज्ञान सांगणारे एन. ए. मुजावर हे स्वत:च कायद्याचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप दलित प्रगतीपर सेनेचे राज्य अध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.