महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत सर्वाधिक थंड तापमानाची नोंद! हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी

06:51 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीत 13 वर्षातील सर्वाधिक थंड तापमानाची नोंद : विमान, रेल्वे सेवेवर परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, शिमला

Advertisement

हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागात आणि इतर उंच भागात वर्षातील पहिल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात बरीच घट झाल्याची नोंद आढळून आली आहे. दिल्लीत गेल्या 13 वर्षातील सर्वाधिक थंड तापमानाची नोंद झाली असून पहाटेच्यावेळी धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामत: विमान आणि रेल्वे सेवेवर विपरित परिणाम झालेला दिसून येत आहे.

हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवर्षावामुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह 134 रस्ते बंद करण्यात आले. मंगळवारी रात्रीपासून अधूनमधून बर्फवृष्टी सुरू आहे. तसेच आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्मयता आहे. हवामान खात्याने 31 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणी मुसळधार हिमवृष्टी आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मनाली, डलहौसी, सांगला, नारकंडा आणि कुफरी या प्रमुख पर्यटन रिसॉर्ट्समध्ये मध्यम हिमवृष्टी झाली, तर मध्य आणि खालच्या टेकड्यांवर विखुरलेला पाऊस झाला. सकाळच्या सुमारास काही ठिकाणी थंडीची लाट कायम असून काही ठिकाणी दाट धुके दिसून आले. याचदरम्यान लोक लोकरीचे कपडे परिधान केलेले दिसून आले.

राज्यातील बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची आशा असल्याने पर्यटन व्यावसायिकही उत्साहात आहेत. हिमवृष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून येत्या काही दिवसांत चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा असल्याचे एका स्थानिक हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. हिमवृष्टी आणि पावसामुळे शेतकरी आणि फळे आणि भाजीपाला उत्पादकांना किंचित दिलासा मिळाला आहे. यापूर्वी दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. सध्याचा पाऊस हा रब्बी पिकांसाठी फायदेशीर आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article