कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर तालुक्यात थंडीची चाहूल

12:43 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पारा 15 अंशापर्यंत खाली : थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज 

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्मयात एकीकडे सुगी हंगामाला जोर आला असताना तालुक्मयात आता थंडीची चाहूल जाणवत आहे. गेल्या दोन दिवसापासून आकाशातील ढग पूर्णपणे नाहीसे झाले असून, आकाश निरभ्र दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून हवामानात एकदमच बदल झाला आहे. रविवारी हवेत एकदम गारठा पडला. तर सोमवारी पहाटे कडाक्याची थंडी पडली होती. तपमान 15 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. आकाशात ढग नसल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

यावषी पावसाळा अधिक झाल्याने तसेच पावसाळा लांबल्याने कडाक्मयाची थंडी पडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. पुढील दोन-तीन महिने थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीचा सामना लागणार आहे. मात्र वारंवार होत असलेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा वातावरण पावसाळी बनेल काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कापणीसाठी यांत्रिक उपकरणांचा आधार

तर दुसरीकडे खानापूर तालुक्मयात भातकापणीच्या हंगामाला जोर आला आहे. भातकापणी करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग शिवारात झाली आहे. एकाचवेळी भात कापणीला जोर आल्याने मजुरांचा तुटवडाही जाणवू लागला आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आता यांत्रिक उपकरणाच्या आधारावरच भात कापणीला जोर देताना दिसत आहेत. यावषी पावसाने उत्तम साथ दिल्याने पिके जोमात आली आहेत. मान्सूनच्या पावसानंतर परतीच्या पावसानेही जोर लावल्याने उभ्या भात पिकात पाणीसाठा व चिखल असल्याने कापणी करताना मात्र शेतकरी मजुरांना कसरत करावी लागत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article