राज्यात थंडी वाढली
उत्तरेकडून अतिशय थंड वारे वाहत असल्याने राज्यात थंडी वाढत आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्राबरोबरचं उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात हाडे गोठवणारी थंडी पडली आहे.
पुणे येथील किमान तापमान १० अंशापर्यंत घसरले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे राज्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यातील नीच्चांकी तापामानाची प्रथमच नोंद झाली आहे.
कडाक्याच्या थंडीत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर येथे ३.८ इतके राज्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ६.१ अंश सेल्सियस इचकी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या तापामानामुळे नाशिक जिल्ह्यातील दाक्ष्यांच्या मण्यांना तडे जातील अशी भितीही वर्तविली जात आहे.