For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीसह चार राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा

06:01 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीसह चार राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा
Advertisement

धुक्यामुळे दिल्लीत 22 रेल्वेगाड्या उशिरा शाळांच्या सुट्ट्या पाच दिवसांनी वाढवल्या

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर भारतात कडाक्मयाची थंडी कायम आहे. हवामान खात्याने रविवारी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये आणखी काही दिवस कडाक्मयाच्या थंडीचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी थंडीची लाट येण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. धुक्मयामुळे राजधानी दिल्लीत रविवारी 22 रेल्वेगाड्या एक ते साडेसहा तास उशिराने पोहोचल्या. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहार येथून येणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. दिल्लीतील थंडी पाहता राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सुट्ट्या 12 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

Advertisement

हवामान खात्याने जाहीर केलेल्या अहवालानुसार सध्या 14 राज्यांमध्ये धुके कायम आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय ईशान्येकडील आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही दाट धुक्मयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एकीकडे थंडीचा कडाका सुरू असतानाच मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. यानंतर येथील तापमानात 3 ते 4 अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी रांचीसारख्या शहरात दाट धुके होते. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :

.