Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका, तापमान 16 अंशाच्या खाली
कोल्हापुरात पहाटे गारठा वाढला
कोल्हापूर : उत्तर भारतात तापमानात कमालीची घट होत असल्यामुळे राज्यात बंहीची लाट पसरत आहे. परिणामी, राज्यासह जिल्ल्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. कोल्हापुरात गुरुवारी किमान तापमान १६ अंशाच्या खाली आले होते. त्यामुळे बंडीची हुहुहुही कायम आहे. असे असले तरी येत्या दोन दिवसात थंडीची तीव्रता थोडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
जिल्ल्यात थंडीचा कडाका कायम असुन पहाटेपासुनच थंडीची तीव्रता वाढल्याची दिसुन येत आहे. सकाळी उबदार कपडे परीधान करूनच नागरिक घराबाहेर पडतानाचे चित्र पहायला मिळत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत हुडहुडी जाणवत असुन दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे. थंडीत पहाटे फिरायला येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागात रोकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे. कोरडे हवामान, स्वच्छ आकाश यामुळे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटे गारठा वाढला
थंडीचे प्रमाण कमी होईल
राज्यात उत्तरेकडील बंड आणि कोरडे वारे वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंही जाणवत आहे. पहिल्या थंडीचे स्वरूप हे लाटेसदृश्य असून तापमानात घट होताना दिसत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात पूर्वेला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्वेकडील वारे राज्याकडे वाहू लागतील, ज्यामुळे पुढील आठवड्यात तापमानात हळूहळू वाढ होईल आणि बेहीचे प्रमाण कमी होईल.
- डॉ. युबराज मोटे, पर्यावरण तज्ज्ञा