महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट निविदेला थंडा प्रतिसाद

06:26 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बस स्थानकातील दुकान गाळ्यांकडे पुन्हा पाठ

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

रेल्वे स्टेशन समोरील कॅन्टोन्मेंट बस स्थानकातील दुकान गाळ्यांच्या निविदांकडे नागरिकांनी पुन्हा एकदा पाठ फिरविली आहे. सहाव्यांदा निविदा काढून देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला आता दुकान गाळ्याचे भाडे कमी करावे लागणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत कॅन्टोन्मेंट बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या दरम्यान एकूण 12 दुकान गाळे बस स्थानकाच्या भोवताली उभारण्यात आले. 67.27 चौरस फूट आकाराचे हे दुकान गाळे आहेत. यापूर्वी पाचवेळा निविदा काढून देखील दुकान गाळ्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. पुन्हा सहाव्यावेळी 19 जून रोजी निविदा मागविण्यात आल्या.

दुकान गाळा क्र. 1 ते 6 साठी 5,500 रुपये मासिक भाडे तसेच 25 हजार रुपये डिपॉझिट निश्चित करण्यात आले होते. तर दुकान गाळा क्र. 7 ते 12 साठी मासिक भाडे 7500 रुपये तर 30,000 रुपयांची डिपॉझिट ठेवण्यात आले होते. 4 जुलैपर्यंत निविदा प्रक्रियेतील अर्ज घेण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु या निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद मिळाल्याने आता तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड या दुकान गाळ्यांचे भाडे कमी करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रवासी संख्या मर्यादित

पूर्वी कारवार, गोवा तसेच कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील काही मोजक्या बस ये-जा करीत असल्यामुळे प्रवासी संख्या अधिक होती. परंतु सध्या केवळ मोजक्याच लांब पल्ल्याच्या व स्थानिक बस येत आहेत. कारवार, गोव्याला जाणाऱ्या बस गोगटे सर्कल येथे थांबत आहेत. तर कोकणात जाणाऱ्या बस थेट सेंट झेवियर्स स्कूल समोरील चंदगड बस स्टॉप येथे जात असल्यामुळे कॅन्टोन्मेंट बस स्थानकातील प्रवाशांची संख्या मंदावली आहे. प्रवासीच नसतील तर दुकानांमध्ये खरेदी कोण करणार? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article