कोफोर्जकडून एनकोराचे अधिग्रहण
06:33 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
जगातील सर्वात चौथा मोठा व्यवहार
Advertisement
मुंबई :
आयटी सेवा क्षेत्रामध्ये मिडकॅप कंपनी कोफोर्जने अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी एनकोराचे अधिग्रहण केले असल्याची माहिती मिळते आहे. सदरचा अधिग्रहणाचा करार 2.35 अब्ज डॉलर रुपयांना झाला असल्याचे समजते. सदरचा कराराचा खरेदीचा व्यवहार समभागांच्या माध्यमातून होणार आहे. जागतिक स्तरावर पाहता अभियांत्रिकी सेवा क्षेत्रामधील कोफोर्जचा हा ताजा कराराचा व्यवहार सर्वात मोठा चौथा व्यवहार मानला जातो.
Advertisement
काय म्हणाले सीईओ
कोर्फाजचे सीईओ सुधीरसिंग म्हणाले की, एनकोरा कंपनीचे अधिग्रहण आमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये खूपच चांगले असणार आहे. कंपनीला या योगे एआयच्या क्षेत्रामध्ये अधिक गतीने उत्तम अशी प्रगती साधता येणार आहे.
Advertisement