काही तासांतच देशभरात आचारसंहिता लागू....? लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार
भारतीय निवडणूक आयोगाकडून (ECI) 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या शनिवारी दुपारी 3 वाजता जाहीर होणार असून लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे काही तासामध्ये देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना केंद्रिय निवडणुक आयोगाकडून निवडणुकांचे वेळापत्रक उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या शनिवारी दिनांक 16 मार्च रोजी निवडणुक आयुक्तांकडून पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहीती दिली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे देशभरातील राजकिय पक्षांबरोबरच मतदारांना या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत, प्रत्यक्ष मतदान किती तारखेला आहे, निकाल किती तारखेला लागणार अशा अनेक गोष्टीची उत्सुकता लागली आहे. उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर कोणत्याही राजकिय पक्षांना आणि नेत्यांना पायाभरणी किंवा कोणत्याही प्रकारचे प्रकल्प किंवा योजना यांचे अनावरण करण्यात येणार नाही. निवडणुक आयोगाने निवडणुक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर केल्या वेळेपासून देशभरात आचार संहिता लागू होणार आहे. त्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असल्याचं दिसून येत आहे.