महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदवाडीत कोसळले नारळाचे झाड

06:45 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीजवाहिन्यांचे नुकसान, वादळी पावसाचा फटका

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

हिंदवाडी परिसरात नारळाचे झाड विद्युततारांवर कोसळल्याने नुकसान झाले. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने दुर्घटना टळली. मात्र झाड पूर्णपणे रस्त्यावर कलंडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे कमकुवत झाडांची पडझड होऊ लागली आहे. घराच्या कंपाऊंडमध्ये असलेले हे नारळाचे झाड विद्युतवाहिन्यांवर कोसळले आहे.

उंच असलेले नारळाचे झाड रस्त्यावरच कलंडल्याने घराच्या संरक्षण भिंतीचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. विविध ठिकाणी झाडे कोसळून नुकसान होऊ लागले आहे. नारळाचे झाड विद्युतवाहिन्यांवर कोसळल्याने काहीकाळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान कर्मचाऱ्यांनी तातडीने दाखल होत मार्ग मोकळा करून दिला. त्याचबरोबर विद्युतवाहिन्या सुरळीत करून वीजपुरवठा सुरू केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article