For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉकरोच जनता पक्ष दिल्लीत करणार निदर्शने

06:22 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॉकरोच जनता पक्ष दिल्लीत करणार निदर्शने
Advertisement

पक्षाचा संस्थापक येणार भारतात : विमानतळावर भेटण्याची फॉलोअर्सना सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कॉकरोच जनता पक्षाचा संस्थापक अभिजीत दिपके यांनी 6 जून रोजी भारतात परत येणार आणि दिल्लीत एक शांततापूर्ण निदर्शने करणार असल्याचा दावा केला आहे. परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थी त्रसत असल्याचे म्हणत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Advertisement

अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला, यात त्यांनी स्वत:च्या समर्थक आणि विद्यार्थ्यांना माझ्यासोबत ल्लीत आवाज उठवा असे आवाहन पेले आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. राज्यघटनेच्या मार्गावर चालत शांततेत आमचे म्हणणे मांडू आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करू. जर आम्ही एकत्रितपणे आवाज उठविल्यास सरकारला ऐकणे भाग पडेल असा दावा दिपके यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.

6 जून रोजी सकाळी मी दिल्लीत पोहोचणार आहे. विमानतळावरच माझे लोकांनी स्वागत करावे. यानंतर आपण सर्वांनी मिळून संसद मार्ग पोलीस स्थानकात जाऊ आणि जंतर-मंतर येथे निदर्शनासाठी अनुमतीची मागणी करूया. परीक्षेशी निगडित गैरप्रकार आणि वादांमुळे विद्यार्थी त्रस्त असून याप्रकरणी सरकारने जबाबदारी स्वीकारावी असेही त्यांनी म्हटले आहे.

नीट परीक्षेशी निगडित वादामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रभावित झाले आहे. या मुद्द्यावर मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि युवांनी माझे समर्थन केले आहे. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांसाठी उत्तरदायित्व निश्चित होणे आवश्यक आहे आणि कुणी तरी याची जबाबदारी स्वीकारावी. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन एका ऑनलाइन याचिकेला लाखो लोकांचे समर्थन मिळाले आहे. तसेच देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये विद्यार्थी आणि युवांकडून निदर्शने केली जात असल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.

कॉकरोच जनता पक्ष काय आहे?

कॉकरोच जनता पक्ष प्रत्यक्षात युवांकडुन चालविण्यात येणारी सोशल मीडिया मूव्हमेंट आहे. ही अभिजीत दिपके यांनी सुरू केली होती. हा पक्ष सोशल मीडियावर अत्यंत वेगाने लोकप्रिय झाला असून अनेक दिग्गज व्यक्तींनीही याला फॉलो केले आहे. इन्स्टाग्रामवर याचे 22 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Advertisement
Tags :

.