कॉकरोच जनता पार्टीच्या तीन प्रवक्त्यांची घोषणा
07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने बुधवारी 3 प्रवक्त्यांची नावे जाहीर केली आहेत. या तिघांवरही कथित पक्षाकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये लोक अन् प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडण्याची जबाबदारी असणार आहे. यात शोधपत्रकार सौरभ दास यांनी मुख्य प्रवक्ता म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया तसेच आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आशुतोष रांका हे प्रवक्ते म्हणून काम पाहतील. कॉकरोच जनता पार्टी भारताच्या राजकीय चर्चेची दिशा बदलण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि या प्रयत्नाचे नेतृत्व नेत्यांची एक नवी पिढी करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्ट करत करण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement