कोचीन शिपयार्डचा नफा 174 कोटींच्या घरात
पहिल्या तिमाहीमधील आकडेवारी सादर : शिपबिल्डरचे उत्पन्न 62 टक्क्यांनी वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
जहाज बांधणी आणि देखभाल कंपनी कोचीन शिपयार्डने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 174 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात 76 टक्क्यांची वाढ झाली आहे. Qआर्थिक वर्ष 2024 मध्ये (आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत), कंपनीला 99 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
कंपनीच्या ऑपरेशन्समधील एकत्रित कमाईबद्दलची आकडेवारी पाहिल्यास एप्रिल-जून तिमाहीत कमाई 771 कोटी रुपयांची आहे. त्यात 62 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 476 कोटी रुपयांची कमाई केली होती.
समभाग 239 टक्क्यांनी वाढले
कोचीन शिपयार्डचे समभाग गुरुवारी 1.76टक्क्यांवरुन घसरून ते 2308 रुपयावर बंद झाले. कंपनीचे गेल्या 5 दिवसात 10.27 टक्के आणि एका महिन्यात 17.70 टक्के इतके घसरले आहेत. या वर्षी 1 जानेवारीपासून कोचीन शिपयार्डचा समभाग 238.70 टक्क्यांवर वधारला आहे. कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 61 हजार कोटी रुपये आहे.
कोचीन शिपयार्ड 1972 मध्ये बांधले
कोचीन शिपयार्ड लिमिटेड (ण्एथ्) ही भारतातील सर्वात मोठी जहाजबांधणी आणि दुरुस्ती कंपनी आहे. त्याची स्थापना 1972 मध्ये भारत सरकारची कंपनी म्हणून झाली. सुमारे 10 वर्षांनी 1982 मध्ये कंपनीचे कामकाज सुरु झाले.