For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारवाडमध्ये 40 लाखांचे कोकेन जप्त

07:50 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
धारवाडमध्ये 40 लाखांचे कोकेन जप्त
Advertisement

दोन उद्योजकांसह डॉक्टरला अटक : पोलिसांकडून लपवाछपवी

Advertisement

त. भा. वार्ताहर / धारवाड

विद्याकाशी धारवाडमध्ये अमलीपदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे जाळे वाढते आहे. कोकेन वाहतूक करणारे दोन उद्योजक व एका डॉक्टरला धारवाड येथील सीसीबी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून 40 लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Advertisement

उद्योजक ऋषी पांडे, उद्योजक दीपक मुदगल व खासगी इस्पितळातील डॉक्टर सर्वेश पाटील या तिघा जणांना 9 ऑगस्टच्या रात्री गोव्याहून कोकेन घेऊन येताना ताब्यात घेण्यात आले आहे. गोव्याहून हुबळीला कोकेनची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलगेरी रोडवरील विनायकनगरजवळ कार अडवून तपासणी केली असता सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 18 ग्रॅम कोकेन आढळून आले आहे.

धारवाड उपनगर पोलीस स्थानकात उद्योजक व डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याजवळून कार, मोबाईल व कोकेन असा एकूण 50 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना उशिरा उघडकीस आली असून पोलिसांनी ही बातमी लपवून का ठेवली? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.