‘कोका-कोला’चा चहा लवकरच बाजारात
लिंबू-तुळस व आंबा या दोन प्रकारांमध्ये ऑरगॅनिक चहा उपलब्ध होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
‘ऑनेस्ट टी’ हा ब्रँड कोका-कोला कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑनेस्टच्या मालकीचा आहे. शीतपेय कंपनी कोका-कोला इंडियानेही तयार चहा पेय विभागात प्रवेश केला आहे. कंपनीने हे उत्पादन ऑनेस्ट टी या नावाने लॉन्च केले आहे. यासाठी, कंपनीने लक्झमी ग्रुपच्या प्रतिष्ठित दार्जिलिंग टी इस्टेट, मकाईबारी, रेडी-टू-ड्रिंक आइस्ड ग्रीन टीसाठी भागीदारी केली आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दोन फ्लेवरमध्ये चहा
‘ऑनेस्ट टी’ हा ब्रँड कोका-कोला कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑनेस्टच्या मालकीचा आहे. सदरचा चहा लिंबू-तुळस आणि आंबा या दोन फ्लेवरमध्ये उपलब्ध असेल. हा एक प्रकारचा सेंद्रिय चहा असेल. उत्पादनासाठी ऑर्गेनिक ग्रीन टी कोलकाता स्थित लक्ष्मी टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या मकाईबारी टी इस्टेटमधून मिळवला जाईल, असे पीटीआयच्या अहवालात कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. बंगाल ग्लोबल बिझनेस समिटच्या सातव्या आवृत्तीत दोन्ही कंपन्यांमध्ये या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कोका-कोलाचा चहा पेयमध्ये का प्रवेश?
कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ग्राहकांना एक व्यापक पेय पर्याय उपलब्ध करून देणे हा चहा सादरीकरणामागचा उद्देश होता. आइस्ड ग्रीन टी लिंबू-तुळस आणि आंब्याच्या प्रकारात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोका-कोला इंडिया आणि साउथवेस्ट एशियाचे मार्केटिंग-हायड्रेशन, कॉफी आणि चहा श्रेणीचे संचालक कार्तिक सुब्रमण्यम यांनी, ‘आम्ही आमच्या नवीन रेडी-टू-ड्रिंक आइस्ड ग्रीन टी सादर करताना आनंदी आणि उत्साही आहोत असे म्हटले आहे.