For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय कोका-कोला आयपीओच्या तयारीत

06:32 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय कोका कोला आयपीओच्या तयारीत
Advertisement

वृत्तसंस्था नवी दिल्ली 

Advertisement

देशात लवकरच आणखी एक मोठा आयपीओ येऊ शकतो. जगप्रसिद्ध शीतपेय कंपनी कोका-कोला आपली भारतीय बॉटलिंग कंपनी हिंदुस्थान कोका-कोला बेवरेजेसला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी या आयपीओद्वारे सुमारे 1 अब्ज डॉलर (सुमारे 9,532 कोटी) उभारू शकते.

कोका-कोला इंडियाच्या आयपीओची तयारी

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, कोका-कोलाने या आयपीओसाठी अनेक गुंतवणूक बँकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. पुढील आठवड्यात लंडनमध्ये या बँकांसोबत बैठक होणार आहे. कंपनीचे आर्थिक सल्लागार रॉथशिल्ड अँड कंपनी ही प्रक्रिया हाताळत आहेत. तथापि, आयपीओ कधी येईल, तो किती मोठा असेल आणि शेअर्स कोणत्या किमतीला विकले जातील, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत या योजनांमध्ये बदल होऊ शकतो.

8,500 कोटींच्या मूल्यांकनाची तयारी

सूत्रांनुसार, कोका-कोलाला आपल्या भारतीय बॉटलिंग कंपनीचे मूल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 85,000 कोटी रुपये) ठेवायचे आहे. तथापि, कंपनीने अद्याप या बातमीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

 कंपनीची उलाढाल काय?

हिंदुस्थान कोका-कोला बेवरेजेस कोका-कोला पेयांच्या बॉटलिंग आणि पुरवठ्याचे काम करते. ही भारतातील सर्वात मोठ्या बॉटलिंग कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी आपली उत्पादने 17 लाखांहून अधिक दुकानांमध्ये पोहोचवते. कंपनीचे 12 राज्यांमध्ये 14 उत्पादन प्रकल्प असून 5,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ही कंपनी दक्षिण आणि पश्चिम भारतातील 236 जिह्यांमध्ये कार्यरत आहे.

अलीकडच्या काळात, अनेक परदेशी कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. ह्युंदाई मोटर इंडियाने 2024 मध्ये 3.3 अब्ज डॉलर्सचा भव्य आयपीओ आणला होता. त्याच वेळी, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियानेही आपला आयपीओ बाजारात आणला आहे. जर आता हिंदुस्थान कोका-कोला बेवरेजेसचा आयपीओ आला, तर तो भारतीय शेअर बाजारातील सर्वात चर्चेत असलेल्या आयपीओंपैकी एक ठरू शकतो.

Advertisement
Tags :

.