वादळी लाटांदरम्यान तटरक्षक दलाची कमाल
150 किमी अंतरावरील बहुमूल्य वैज्ञानिक डाटाबॉय सुरक्षित काढला बाहेर
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
भारतीय तटरक्षक दलाने एक मोठे यश मिळविले आहे. अत्यंत आव्हानात्मक सागरी स्थितीत तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात वाहून गेलेल्या वैज्ञानिक डाटाबॉयला सुरक्षित बाहेर काढले आहे. बंगालच्या उपसागरात हा डाटा बॉय स्वत:च्या निर्धारित स्थितीवरून वाहत दूर गेला होता. हा एक एमओईएस-एनआयओटी वैज्ञानिक डाटाबॉय आहे.
तटरक्षक दलाने याला यशस्वीपणे शोधून सुरक्षित स्वत:च्या नियंत्रणात घेतला आहे. आव्हानात्मक सागरी स्थितींदरम्यान तटरक्षक दलाच्या राणी गॅदिन्लियू नौकेने हे अभियान पूर्ण केले आहे. हे अभियान सागरात वैज्ञानिक उपकरणांची सुरक्षा आणि संरक्षणाबद्दल तटरक्षक दलाच्या प्रतिबद्धतेचे आणखी एक उदाहरण आहे. हा वैज्ञानिक डाटाबॉय आंध्रप्रदेशच्या नेल्लोर किनाऱ्यावरील स्वत:च्या निर्धारित स्थितीपासून 150 किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत वाहून गेले होते.
सागरात जोरदार वारे आणि प्रतिकूल स्थिती असतानाही तटरक्षक दलोन अचूक शोध अभियान राबवत या बहुमूल्य वैज्ञानिक उपकरणाला सुरक्षितपणे हस्तगत केले आहे. हा डाटाबॉय सागरी वातावरणाशी निगडित महत्त्वपूर्ण वैज्ञानिक आकडेवारी म्हणजेच सागरी लाटा, तापमान, प्रवाह, हवामान तसेच अन्य सागरी परिस्थितींचा डाटा एकत्र करतो. या आकडेवारीचा वापर हवामान पूर्वानुमान, सागरी संशोधन, किनारी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन तसेच सागरी हालचालींच्या देखरेखीत केला जातो.
स्वत:च्या निर्धारित जबाबदारीच्या अंतर्गत आम्ही केवळ सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव तसेच प्रदूषण नियंत्रणापर्यंत मर्यादित नाही, तर समुद्रात स्थापित वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन प्रकल्पांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध असल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. अशाप्रकारच्या अभियानांमुळे देशाच्या सागरी वैज्ञानिक कार्यांना निरंतर समर्थन मिळते आणि महत्त्वपूर्ण वैज्ञानिक उपकरणांची सुरक्षा सुनिश्चित होते.