महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘कोल’चा कोळशापासून गॅस निर्मितीचा उपक्रम

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोल इंडिया व बीएचइएल यांची हातमिळवणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने कोळशापासून गॅस बनवण्याची योजना लागू केली आहे. अनेक दशकांपासून मंत्रालयांमध्ये हा वादाचा मुद्दा राहिला आहे. सीआयएल व बीएचइएल यांच्या भागीदारीत भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स (बीसीजीसीएल) ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. कोल इंडियाच्या कोळसा खाणींमधून 6.60 लाख टन अमोनियम नायट्रेट तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 11,782 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 1,350 कोटींची तरतूद करण्यात आली होती. कोल इंडिया आणि बीएचइएलने मे 2024 मध्ये बीसीजीसीएल ही संयुक्त उद्यम कंपनी स्थापन केली. यामध्ये सीआयएल यांच्याकडे 51 टक्के आणि बीएचइएलची 49 टक्के भागीदारी राहणार आहे. सीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीएम प्रसाद यांनी माहिती दिली की या संयुक्त उपक्रमाचा उद्देश गॅसिफिकेशन आणि अंतिम उत्पादनातून मध्यवर्ती उत्पादने म्हणून सायन-गॅस, अमोनिया आणि नायट्रिक अॅसिड तयार करणे आहे. अमोनियम नायट्रेट हे उत्पादन घ्यायचे आहे, असे सांगितले आहे. ‘होणाऱ्या स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेट हा मुख्य घटक असतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article