जूनमध्ये कोळसा उत्पादन 32 टक्क्यांनी वाढले
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशातील कोळसा उत्पादन जून 2022 मध्ये जवळपास 32 टक्क्यांनी वाढून सहा कोटी 75.9 लाख टनाच्या घरात पोहोचले आहे. जे उत्पादन मागील वर्षातील समान कालावधीत पाच कोटी 9.8 लाख टनावर राहिले होते, अशी माहिती कोळसा मंत्रालयाने दिली आहे.
मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार कोल इंडिया लिमिटेड(सीआयएल), सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड(एससीसीएल) आणि खासगी वापर करणाऱया खाणी व अन्य यांचे मिळून पाच कोटी 15.6 लाख टन, 55.6 लाख टन आणि एक कोटी 4.7 लाख टन उत्पादन झाले आहे. यामध्ये क्रमशः आकडेवारी पाहिल्यास 28.87 टक्के, 5.50 टक्के आणि 83.53 टक्क्यांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे.
22 खाणींचे उत्पादन 100 टक्के
प्रमुख 37 कोळसा उत्खननातून 22 खाणींनी आपली क्षमता ही 100 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादनाची केली आहे, आणि अन्य 9 खाणींचे उत्पादन 80 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान राहिल्याचे नेंदवले आहे.
दुसऱया बाजूला कोळसा पुरवठा जून 2021 मध्ये सहा कोटी 25.3 लाख टन ते 20.69 टक्क्यांनी वाढून सात कोटी 54.6 लाख टनावर पोहोचला आहे. यावेळी जून 2022 च्या दरम्यान सीआयएलसह खासगी वापरातील अन्य उत्खननात 15.20 टक्के आणि 88.23 टक्क्यांची वृद्धी नेंदवण्यात आली आहे. यामध्ये क्रमशः पाच कोटी 89.8 लाख टन आणि एक कोटी 10.5 लाख टन इतका कोळसा पुरवठा करण्यात आला आहे.
वाढती वीज मागणी
वाढत्या विजेच्या मागणीमुळे मागील जून महिन्याच्या तुलनेत चालू वर्षातील जूनच्या दरम्यान वीज प्रकल्पातून होणार पुरवठा हा 30.77 टक्क्यांनी वाढून सहा कोटी 48.9 लाख टनाच्या घरात पोहोचला असल्याची माहिती आहे.