For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काले खाण सुरू

12:26 PM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
काले खाण सुरू
Advertisement

खाण संचालक नारायण गाड यांची माहिती

Advertisement

पणजी : राज्यातील खाण व्यवसाय मूळ पदावर येत असून, उत्तर गोवा जिह्यातील विविध ठिकाणचे पाच खाण पट्टे सुरू केल्यानंतर काल गुऊवारी 5 रोजी दक्षिण गोव्यातील काले मिनरल खाण पट्टा-4 सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाचे संचालक नारायण गाड यांनी दिली. गाड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्या पुढाकारामुळे खाण खात्याने आतापर्यंत सहा खाण पट्टे सुरू केलेले आहेत. त्यापैकी पाच खाण पट्टे हे उत्तर गोव्यातील तर एका दक्षिण गोव्यातील खाण पट्ट्याचा समावेश आहे.

काले मिनरल खाण पट्टा-4 हा दक्षिण गोव्यातील सुरू झालेला पहिला खाण पट्टा आहे. सहा खाण ब्लॉक सुरू झाले असले तरी अजूनही सहा खाण पट्टे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. याची प्रक्रिया सुरू झाली असून, स्वत: मुख्यमंत्री सावंत आणि मुख्य सचिव डॉ. कंदवेलू यांनी खाण पट्टे सुरू करण्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करीत आहेत. वनविभाग आणि पर्यावरण खात्याचे दाखले लवकरच मिळण्याची अपेक्षा असून, त्यानंतर ह्या उर्वरित सहा खाणी येत्या एक ते दोन महिन्यात सुरू होतील, असेही गाड यांनी सांगितले.

Advertisement

उर्वरित सहा खाणी सुरू करण्यासाठी खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाचे सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन महिन्यांत सहा खाण पट्टे (ब्लॉक) सुरू होणार आहेत. त्यामध्ये उत्तर गोव्यातील थिवी, सोनशी (सत्तरी), होंडा, कुडणे (डिचोली) ह्या चार खाण पट्ट्यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातील कुर्पे आणि कोडली ह्या दोन खाण ब्लॉकचा समावेश आहे. वनविभाग आणि पर्यावरणासंबंधी दाखल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सहा खाण पट्टे सुरू होतील, असेही गाड यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.